Saturday, August 01, 2009

माझे घर शोधाचे अनुभव


हा एक अनुभव आहे, एका नावाजलेल्या बिल्डरच्या बाबतीत.
मला अपार्टमेंट प्रोजेक्टमधले घर आवडले. मी अ‍ॅग्रीमेंटची ड्राफ्ट कॉपी वाचायला मागितली. तर मला त्या सेल्समॅनेजरने ऑफिसमधल्या एकाचा नंबर दिला आणि ऑफिसमधे भेटण्यास सांगीतले. जेव्हा मी त्या ऑफिसमधल्या माणसाला फोन करून विचारलं की केव्हा येउ, तर तो म्हणाला की ईमेल अ‍ॅड्रेस द्या, तो ईमेल करेल. मला काही ईमेल आला नाही. म्हटलं की मेलबॉक्समधे काही प्रॉब्लेम असेल तर दुसरा ईमेल दिला, पण त्याने काही ईमेल केला नाही. वाट पाहण्यातच जास्त वेळ गेला. प्रोजेक्टमधे काही शेवटचेच फ्लॅट्स शिल्लक होते, त्यामुळे उशीर झाल्याने हवा तो फ्लॅट शिल्लक उरला नाही. नंतर जेव्हा परत सेल्समॅनेजरकडे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली तेव्हा तो म्हणाला की कदाचित बाकी बिल्डरही त्याच्या अ‍ॅग्रीमेंटची कॉपी करून वापरतील, म्हणून ते लोक ईमेलवर माहिती पाठवत नाहीत.

घ्या. पण मी कुठे ती ईमेलवरच पाहिजे म्हणून सांगीतलं? त्या ऑफिसमधल्या माणसानेच मला ईमेल विचारून पाठवतो म्हणून सांगीतलं. मी दोनदा त्याला ऑफिसमधे येतो म्हटलं होतं. कशाला उगाच काहीतरी सांगून ते टाळायचं? त्याला काय खुप काम पडलं होतं म्हणून मला टांग मारली, का उगाच मला भलताच काँपिटीटर समजला, तेही मी त्याला रेफरन्स व्यवस्थित सांगीतला असताना?
का उगाच आपल्या ग्राहकांनी अ‍ॅग्रीमेंटबद्दल जास्ती जागरूक राहू नये म्हणून एवढी टोलवाटोलवी?
मी मात्र ठरवलं आहे. जर का बिल्डरनी ड्राफ्ट कॉपी साधी पाहू सुद्धा दिली नाही तर बुकिंगसुद्धा करायची नाही.

No comments:

Post a Comment